असंघटित क्षेत्रातील कामगारांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान न दिल्यास आंदोलन

भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत ठराव मंजूर:हरी चव्हाण

*⚡मालवण ता.१४-:* गेल्या दीड वर्षापासून सर्व समाज, कामगार वर्ग संघर्ष करतो आहे. संघटित / असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक कामगार हाताला काम मिळत नसल्याने आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घरेलु कामगार, रिक्षा, टॅक्सी चालक, सुरक्षा रक्षक अशा प्रकारे बारा बलुतेदार असलेल्या कामगारांचा रोजगार पूर्णपणे धोक्यात आला असून कामगारांचे जगणं कठीण झाले आहे अशा वेळी असंघटित क्षेत्रातील कामगारांना राज्य सरकारने सरसकट १० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे प्रसंगी या मागणीच्या पूर्ततेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा ठराव पुणे येथील भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे कोकण विभाग संघटनमंत्री हरी चव्हाण यांनी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुणे येथील विश्वकर्मा भवन येथे संपन्न झाली. या बैठकीची माहिती श्री हरी चव्हाण यांनी पत्रकाव्दारे दिली आहे भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री ऍड. विशाल मोहिते यांनी गेल्या दीड वर्षापासून सर्व समाज, कामगार वर्ग संघर्ष करतो आहे. संघटित / असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक कामगार हाताला काम मिळत नसल्याने आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घरेलु कामगार, रिक्षा, टॅक्सी चालक, सुरक्षा रक्षक अशा प्रकारे बारा बलुतेदार असलेल्या कामगारांचा रोजगार पूर्णपणे धोक्यात आला असून कामगारांचे जगणं कठीण झाले आहे. शासनाने मदतीच्या नुसत्या घोषणा केल्या आहेत. मात्र जाहीर केलेली तुटपुंजी मदत शासन निष्कर्षामुळे अजून ही लालफितीत अडकली आहे. ऑनलाईन नोंदणीचे ज्ञान नसल्याने ९० टक्के पेक्षा जास्त कामगारांना मदत मिळालेली नाही. केंद्र सरकारने गरिब लोकांना मोफत धान्य दिले आहे. मात्र राज्य सरकारने त्यांचा व्यवस्थित पाठपुरावा केला नाही. त्यामुळे कामगारावरती उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान त्वरित लागू करावे. अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा ठराव करण्यात आला या ठरावास सिंधुदुर्ग जिल्हा सचिव हरी चव्हाण यांनी अनुमोदन दिले. बैठकीस भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमने, प्रदेश सरचिटणीस मोहन येणूरे, शंभू खंडाळे, कृष्णा साठे, अण्णा धुमाळ, रवींद्र देशपांडे, सचिन मेंगाळे, उमेश विश्वाद, अर्जुन चव्हाण, शामराव भोळे, गजानन पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page