वाघेरी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ १५ रोजी उपोषणास बसणार

*⚡कणकवली ता.१४-:* वाघेरी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ १५ऑगस्ट २०२१रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.सिंधुदुर्ग यांच्या दालनासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन ग्रामपंचायत उपसरपंच अनुजा राणे,ग्रामपंचायत सदस्य मंगेश नेवगे,तुकाराम गुरव,प्रकाश वाघेरकर, गीतांजली गुरव व ग्रामस्थ सिद्धेश राणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. वाघेरी गावातील वाढते भ्रष्टाचार तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या भ्रष्टाचार यामध्ये चौकशीअंती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.सिंधुदुर्ग,गटविकास अधिकारी ,पं. स.कणकवली यांनी त्यांच्या अहवालात सरपंच दोषी असल्याचे नमूद करून त्यांच्यावर ३९(१)नुसार कारवाई साठी अहवाल तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे सादर केला होता यावर कोकण विभागिय आयुक्त यांनी २४/०३/२०२१रोजी अंतिम सुनावणी घेतली होती.यावेळी ग्रामपंचायत सदस्य यांनी सबळ पुरावे सादर केले होते.तरीही अद्याप आयुक्तांनी निर्णय न दिल्यामुळे त्याचप्रमाणे १४वा वित्त आयोग/ग्रामनिधी/पर्यावरण या निधीमधून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २४/१०/२०२०रोजी दिलेली होती परंतु यास जवळपास १०महिने होऊनही अद्याप कार्यवाही न झाल्यामुळें आम्ही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ १५ऑगस्ट २०२१रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.सिंधुदुर्ग यांच्या दालनासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

You cannot copy content of this page