शासनाच्या नियमावलीचे पालन करून जत्रोत्सव होणार साजरा
*💫सावंतवाडी दि.१४-:* मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव १९ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात तरंगासहीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री मळगाव येथील स्थानिक दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहभागी व्हावे, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.