अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल..
*💫सावंतवाडी दि.१४-:* माजगाव येथील एका नर्सरी मधून अज्ञात चोरट्याने तब्बल ११ हजार ५०० रुपये किंमतीची झाडे चोरली असल्याचा प्रकार आज घडला आहे. याबाबतची तक्रार पुष्पराज सावंत यांनी पोलिस ठाण्यात दिली असून, सावंतवाडी ठाण्यात त्या अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा पासून पहाटेच्या दरम्यान घडला आहे. हा प्रकार आज सकाळी सावंत नर्सरीत आल्यानंतर उघडकीस आला आहे