ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील १० टक्के आरक्षणातील पद भरतीत मान्यता मिळावी : अन्यथा लाक्षणिक उपोषण

*ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी दिला इशारा

*💫सावंतवाडी दि.१४-:* कोरोना काळात पद भरती रखडल्याने सेवाजेष्ठता यादीतील काही ग्रामपंचायत कर्मचारी माहे ङिसेबर २०२० नंतर अपात्र होणार असल्याने यादीतील कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत भरावयाची १० टक्के आरक्षणातील पद भरतीत मान्यता मिळावी, अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा इशारा महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी दिला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवेतील पद भरतीत १० टक्के आरक्षण आहे. ही पद भरती ही सरळसेवेने भरावयाची असल्याने विहीत वेळेत भरणे गरजेचे होते. परंतु भरली गेली नाहीत. तसेच कोरोना प्रादुर्भावकाळात भरतीवर निर्बंध आले, मात्र शासनाने आता काही प्रमाणात पद भरतीस मान्यता दिली. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत भरावयाची १० टक्के आरक्षणातील पद भरतीत मान्यता मिळावी, अशी मागणी हरिश्चंद्र आसयेकर यांनी ग्रामविकास विभागाचे अपर सचिव कक्ष अधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page