खर्डेकर महाविद्यालयात कला शाखेत प्रथम आलेल्या रुपाली मोकाशी पाटीलचा सत्कार

*⚡वेंगुर्ले ता.१२-:* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात कला शाखेत प्रथम आलेल्या रुपाली मोकाशी पाटील यांचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी तिच्या घरी जाऊन पुष्पगूच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मुळात शिक्षणाची आवड व जिद्द असल्यामुळे तब्बल वयाच्या 41 साव्या वर्षी 12 वी कला शाखेतून महाविद्यालयात प्रथम आल्या. याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रात अभिनंदन होत आहे. महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक डी एस पाटील, सौ. व्ही व्ही सावंत, सौ. आर आर पार्सेकर, एच डी गावडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page