*💫सिंधूदुर्गनगरी दि.१४-:* कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतिने तसेच युवक मित्र मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत कुंदे गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. कसाल ते कुंदे जिल्हा परिषद मुख्य रस्ता तसेच कुंदे गावातील 9 वाड्या, गावातील जाणाऱ्या पाय वाटा. सार्वजनिक रस्ते, विहिरी, मंदिरे, शाळा परिसर , ग्रामपंचायत परिसर या सर्वांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साफसफाई करण्यात आली. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडी- झुडपे ग्रामस्थांच्या वतीने तोडण्यात आली. गेल्या वर्षी जिल्हा परिषद विभागीय मतदारसंघात कुंदे गावाने स्वच्छता अभियानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान याकरिता हे गाव पुरस्कारासाठी वाटचाल करीत आहे. या गावात कृषी विज्ञान केंद्र, भगीरथ प्रतिष्ठान, लुपिन फाउंडेशन यांच्या सहकार्य मार्फत ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांची योजनेची वाटचाल चांगल्या प्रकारे सुरु आहे. लोकसहभाग मिळत असल्याने महिला बचत गट, युवक मंडळे शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. गावच्या एकजुटीने चांगले काम करत महाराष्ट्र शासनाचा संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुरस्कार आम्ही मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे कुंदे सरपंच सचिन कदम यांनी बोलताना सांगितले. यावेळी उपसरपंच सुशील परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब आदीसह 9 वाड्यांचे ग्रामस्थ युवक मित्र मंडळ महिला व बचत गट आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी मोठ्या संख्येने एकत्र येत स्वच्छता अभियान राबविले .
कुंदे ग्रामस्थ आणि युवकांच्या सहकार्याने कुंदे गावात स्वच्छता अभियान संपन्न
