पक्ष संघटनावाढीचा मनसेच्या कणकवलीतील बैठकीत निर्धार
*⚡कणकवली ता.११-:* अवैध मायनिंगमुळे होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हासाला अप्पर जिल्हाधिकारी जबाबदार असून त्याच्याविरोधात ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव ‘याकरिता 23 ऑगस्ट 2021 आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा पोलीस अधीक्षक देण्याचे ठरविण्यात आले. तसेच 15 ऑगस्ट रोजी कळणेवासीयांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा पाठिंबा देणार आहे.यात सर्वांनी सहभाग घ्यावा असे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हाकार्यकारणी सभा मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. या जिल्हा कार्यकारणी सभेत प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुका व पक्ष वाढीच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश अंधारी, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री. विनोद सांडव, दत्ताराम बिरवाडकर,सुनील गवस वैभववाडी मनविसे तालुकाध्यक्ष रुपेश वारंग, गावडे आदी उपस्थित होते.
