प्रवासांना सुदैवाने कोणतीही इजा नाही
*⚡कुडाळ ता.११-:* कुडाळ पंचायत समिती नजीक सावंतवाडीहून कणकवलीला मार्गस्थ होणारे एसटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या साईडला कलंडली व अपघात झाला मात्र या बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवासांना सुदैवाने कोणतेही इजा झाली नाही. गेल्या बुधवारी या ठिकाणी कणकवलीहून सावंतवाडी येथे येणारी एसटी बस कलंडली होती. या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी वेळ असून केवळ सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.सदर वाहतूक होत असलेला रस्ता हा तेलकट व ऑइल च सदृश्य प्रमाण जास्त असल्याने येथे वेळोवेळी वाहतूक करत असताना वाहकांचा ताबा सुटतो व अपघात होत असल्याचे दिसून येत आहे
