राजन चिके,पंढरी वायंगणकर यांनी दिल्ली गाठत ना.नारायण राणे यांना दिल्या शुभेच्छा

*⚡कणकवली ता.११-:* भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन चिके, तालूका सरचिटणीस तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी ही नुकतीच दिल्ली गाठत केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगमन 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. याची जोरदार तयारी जिल्ह्यात सुरू आहे.या आधी त्यांना दिल्लीत जात समर्थक भाजप पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी जात आहेत. यावेळी राजन चिके, पंढरी वायंगणकर या दोन्ही पदाधिकारी यांनी विकासात्मक कामांबाबत नारायण राणे यांना निवेदन सादर करण्यात आले.

You cannot copy content of this page