चेअरमन रमेश पिंगुळकर यांनी केला निवृत्ती निमित्त सत्कार
वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिपाई बापू भिकाजी मोरमकर हे २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जुलै रोजी निवृत्त झाले. यानिमित्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था कार्यकारिणीतर्फे व्हाईस चेअरमन रमेश पिगुळकर यांच्या हस्ते सुवर्ण अंगठी त्यांना प्रदान करण्यात आली. तसेच स्कूलतर्फे संस्था चेअरमन विरेंद्र आडारकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विरेंद्र आडारकर, रमेश पिगुळकर, माजी मुख्याध्यापक सावळाराम कांबळी, माजी हिदी अध्यापक मधुकर कुबल, हिदी अध्यापक वैभव खानोलकर, भक्ती मोरमकर, उल्का वाळवेकर, सत्वशिला सातार्डेकर यांनी बापू मोरमकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. तर श्री.मोरमकर यांनी सर्वांची ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्था कार्यकारिणी सदस्य राधाकृष्ण मांजरेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिपक बोडेकर यांनी तर आभार अनिल गोवेकर यांनी केले.
