तोंडवली बावशी नळ कामगाराला.पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन;

आंदोलन मागे

*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील तोंडवली- बावशी या गृप ग्रामपंचायतने तडकाफडकी नळ कामगार सुनील पवार यांना कामावरुन कमी केले.या विरोधात तोंडवली बोभाटेवाडी येथील नळ धारक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच मनाली गुरव व ग्रामसेवकांना घेराव घालत जाब विचारला. अखेर कामगाराला पुन्हा कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देताच, आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यात सुनिल पवार यांनाच कामावर घेत असून यापुढे नळ ग्राहक यांनी तक्रार केल्यानंतर मासिक सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी नळ कामगार सुनिल पवार यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायती मार्फत करण्यात आला होता ‌. आज या विरोधात तोंडवली बोभाटेवाडी मधील नळधारक महिला व पुरुष एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला.यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. माजी ग्रामपंचायत सदस्य तात्या निकम,युवा सेना उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page