*⚡देवगड ता.०९-:* देवगड तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात शालांत परीक्षा दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थ्यांनी दिव्या सुनील सावंत हीने ९९% गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तसेच उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेत प्राची प्रशांत मसुरकर हिने ९५.३३गुण मिळवून देवगड तालुक्यामध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही विद्यार्थिनींचे रोख रक्कम व गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या जुने विद्यार्थी देवगड येथील असून या सत्कार सोहळ्याप्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी विलास करंजेकर,प्रा. सुरेश सोनटक्के, विलास रुमडे,मोहन कोळंबकर,तसेच विद्यार्थिनीचे पालक उपस्थित होते.
पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
