वेंगुर्ल्याची सेजल अणसूरकर उद्यानविद्या विषयात कोकण विभागात प्रथम

*⚡वेंगुर्ला दि.०९-:* वेंगुर्ला येथील बै. बाळासाहेब खर्डेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सेजल ज्ञानेश्वर अणसुरकर हिने बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. ती उद्यानविद्या विषयात कोकण विभागात पहीली आली आहे. तिने सायन्स विभागान वेंगुर्ले तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तीच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. कु. सेजल ज्ञानेश्वर अणसूरकर ही भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रतिनिधी. श्री ज्ञानेश्वर श्रीधर अणसूरकर व उभादांडा माजी सरपंच सौ. नेहा ज्ञानेश्वर अणसूरकर मांची मुलगी आहे. कु. सेजल हीच्या घरी जाऊन महाविद्यालयाच्या वतीने प्रा. शितोळे सर, प्रा. देसाई सर, प्रा. सूर्यवंशी सर, प्रा. नाईक मॅडम यांनी तिचे कौतुक केले.

You cannot copy content of this page