सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रूग्ण सापडले…

*⚡सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सावंतवाडी १, उभा बाजार ४, बिरोडकर टेंब ३ तर ग्रामीण भागात बांदा १, निरवडे १, मळगाव २, सांगेली २, आरोंदा १, पारपोली ३, मळेवाड १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page