*⚡मालवण दि.०९-:* मालवण येथील सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यालयात (डी. एड. कॉलेज) शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत सूचना, प्रवेश नियमावली राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य हेमंत प्रभू यांनी दिली आहे. येथील डी. एड कॉलेज हे शासकीय मान्यताप्राप्त, अनुदानित व शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारे कॉलेज आहे. याठिकाणी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष डी. एल. एड साठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. इयत्ता बारावी ( कला, शास्त्र व वाणिज्य ) शाखेतील खुल्या वर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण, राखीव वर्गासाठी किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी विद्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य हेमंत प्रभू यांनी केले आहे.
डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने सुरू
