तहसीलदार म्हात्रे यांची बदली तात्काळ रद्द करा

अन्यथा आंदोलन करण्याचा सरपंच संघटनेचा इशारा;जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या उपस्थितीत केला निषेध

*⚡सांवतवाडी ता.०९-:* दोन दिवसात बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करू,असा इशारा सरपंच संघटनेनं दिला आहे. या बदलीचा निषेध करण्यासाठी सरपंच संघटनेने आज तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तहसीलदार बदली करण्यात आली होती. तहसीलदारांची बदली करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, तालुकाध्यक्ष प्रमोद गावडे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, माडखोल सरपंच संजय शिरसाट, नाणोस सरपंच वासुदेव जोशी, मळेवाड सरपंच हेमंत मराठे, आरोंदा सरपंच सुप्रिया पार्सेकर, वेत्ये सरपंच स्नेहा मिठबावकर, पाडलोस अक्षरा पाडलोसकर, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, आंबेगाव सरपंच वर्षा वरक, कारिवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, किनळे सरपंच दीपक नाईक, कोनशी सरपंच सुभाष सावंत, कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, नेमळे सरपंच विनोद राऊळ, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजगाव उपसरपंच संजय कानसे, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, सातोळी बावळट सरपंच दिनानाथ कशाळीकर, ओटवणे सरपंच उत्कर्षा गांवकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page