आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केल्या नियुक्त्या
मालवण दि प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी आज संघटना पातळीवर दोन नव्या नियुक्त्या जाहीर करताना आचरा विभागप्रमुख पदी चिंदर येथील जेष्ठ शिवसैनिक समीर लब्दे यांची तर पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे मालवण दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी आज शिवसेनेत दोन नवीन नियुक्त्या केल्या यात चिंदर येथील समीर लब्दे यांना आचरा विभागप्रमुख पदी तर पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना समन्वयक पदी नियुक्ती दिली आहे. यावेळी भाई कासवकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, अनिल गावकर, किरण वाळके, किसन मांजरेकर यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी समीर लब्दे, चंद्रकांत गोलतकर यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
