मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस च्या बूथ कमिटी वर भर देण्यात येत असून राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची कुडाळ तालुका निरीक्षक पदी निवड करण्यात आली तालुक्यातील सर्व सेल विभागीय कमिटी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून या बूथ कमिटी बनवण्यात येणार असून लवकरच स्वतः प्रांताध्यक्ष नाना पटोले जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, नविनचंद्र बांदिवडेकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, जिल्हा प्रवक्ता इर्शाद शेख, वेंगुर्ले नगरसेवक विधाता सावंत, श्रीकृष्ण तळवडेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, उल्हास मनचेकर, मेघनाथ धुरी, विजय प्रभू, चंदन पांगे व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते
काँग्रेसच्या कुडाळ तालुका निरीक्षकपदी युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची नियुक्ती
