कोकणाच्या विकासाच्या व हिताच्या आड येणारे राजकारण कोणी करू नका : खासदार नारायण राणे

श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा

*💫कुडाळ दि.१३-:* कोकणाच्या हितासाठी राजकारण करा पण कोकणाच्या विकासाच्या व हिताच्या आड येणारे राजकारण कोणीही करू नका. निसर्ग संपन्न अशा वालावल गावाचा सर्वांगीण विकासासाठी व आदर्श गाव बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येवुन काम करूया, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी वालावल येथे केले. तसेच तलावाच्या सुशोभिकरण, तसेच इतर विकास कामांसाठी खासदार निधीतून ५० लाख रुपयाचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती वालावलने गेल्या साडेचार वर्षांतील विकास कामांचे लोकार्पण सोहळा आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज सकाळी ११:३० वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती नुतन आहिर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान सल्लागार समिती सदस्य चारुदत्त देसाई, पंचायत समिती सदस्या प्राजक्ता प्रभू, वालावल सरपंच निलेश साळसकर, श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती वालावलचे अध्यक्ष संग्राम देसाई, पत्रकार राजेश कोचरेकर, भाजपाचे जिल्हा प्रतिनिधी राजु राऊळ, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, डाॅ. मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, राजा प्रभु, मोहन सावंत, नगरसेवक आबा धडाम, राकेश कांदे, सुनील बांदेकर, रूपेश कानडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी नारायण म्हणाले, मेहनत, परिश्रम, निष्ठा ठेवल्याशिवाय देवही आर्शीवाद देत नाही. निसर्गरम्य वालावल माझ्या आवडीचे गाव आहे. विकासात्मक विचाराचे लोक येथे आहेत. येथील मंदीराच्या परिसराचे सुशोभीकरण करतानाच येथे संगणक प्रशिक्षण केंद्र, रुग्णवाहिका सेवा सुरू केली असे, तसेचसमाजपयोगी उपक्रम सुंदर आहेत. मंदिराच्या जवळील तलावाच्या सुशोभिकरणासाठी खासदार निधीतून एप्रिल महिन्यात २५ लाख रुपये व पुढील वर्षी २५ लाख रूपये मिळुन ५० लाख रूपयाचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. निसर्ग संपन्न कोकण पण श्रीमंती पासुन कोकण दुर अशी त्यावेळी अवस्था होती. येथे विकासात्मक कामे होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो. शून्यातून विश्व तयार करा . कोकणी माणसाने महत्वाकांक्षा बाळगली पाहिजे. त्याच्याशिवाय आपली वाटचाल योग्य दिशेने होत नाही. यावेळी संग्राम देसाई यांनी सांगितले की, नारायण राणे यांनी हा गाव दत्तक घेतला ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. समाजपयोगी उपक्रम, कार्यक्रम करावेत ही शिकवण राणेंची, याच शिकवणीतुन पर्यटन व रोजगार निर्माण व्हावा ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून मंदिर सुशोभिकरणा बरोबरच समाजपयोगी उपक्रम येथे सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. व येथे सगंणक प्रशिक्षण, अत्याधुनिक रूग्णवाहीका सुरू केली. याचा उपयोग पंचक्रोशीतील जनतेला होणार आहे. ६०० वर्षे जुने हे मंदिर असुन दगडी खांब, लाकडी कोरीव काम आज पहायला मिळते. दिड वर्षात मंदीर परिसराचे सुशोभिकरण, अपूर्णावस्थेत असलेल्या प्रवेशद्वाराचे तसेच मुखशाळेचे सागवानी लाकडात सुंदर कोरीवकाम करुन पुरातन जपण्याचा प्रयत्न केला आहे. येथील प्रवेशद्वार भाविक व पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा इमारतीतुन येणाऱ्या भाविकांना चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तलावाचे सुशोभिकरण करणे गरजेचे जेणेकरून धार्मिक पर्यटन होवु शकते. या करीता राणे यांनी सहकार्य करावे अशी मागणीही देसाई यांनी केली. यावेळी रणजित देसाई यांनी वालावल गावाचा सर्वांनी एकत्र येत विकास करूया कि जेणेकरून येथील गाव आदर्श गाव म्हणून ख्याती होईल. . यावेळी राणे यांचा सत्कार देसाई यांनी केला. तर सीसीटीव्हि कक्षेत मंदीर आणणारे, संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करणारे संगणक तज्ञ दिपक प्रभु यांचा तसेच, अद्ययावत रुग्णवाहिका देणारे राजेश कोचरेकर, महेश उर्फ मयुर हळदणकर, बांधकाम व्यावसायिक अमोल शिरसाट, पुजारी अय्यर हळदणकर तसेच इतर काही मान्यवरांचा सत्कार राणेच्यां हस्ते करण्यात आला. सुत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर तर आभार रणजित देसाई यांनी मानले.

You cannot copy content of this page