प्रेरणा  स्वयंसहाय्य्यता  बचतगटातील’ महिलांचे समाजभिमुख कार्य …!

सविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप.. !

*💫कणकवली दि.१३-:* अनिकेत उचले बचत गटांच्या माध्यमातून महिला आपली उन्नती साधत असतानाच  ‘प्रेरणा स्वयंसहाय्य्यता बचतगटातील’ महिलांनी समाजभिमुख कार्य केले आहे. वर्षपूर्तीच्या निमित्ताने शनिवारी जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रमाला भेट देत जीवनावश्यक वस्तू अध्यक्ष संदीप परब यायांच्याकडे देण्यात आल्या.         दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत हिरकणी लोकसंचलित सेवा केंद्र स्थापित प्रेरणा स्वसहाय्यता महिलागट कार्यरत असून प्रेरणा बचत गटाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अनोखा उपक्रम राबवत तांदूळ,भाजीपाला,लाडू,बेडशीट आदी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.यापूर्वी हि करंजे येथील गतिमंद विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले होते.       यावेळी  नगरपंचायत चे शहर प्रकल्प अधिकारी अमोल भोगले,सिमा गावडे,सिध्दी नलावडे,स्नेहा कदम,बचतगटातील प्रिया सरूडकर,प्रणाली मयेकर, गीतांजली मालणकर,रजनी सरूडकर आदी महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page