महिलांचा भाजप मध्ये प्रवेश
*💫सावंतवाडी दि.१३-:* ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच शिरशिंगे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. शिवसेनेसह कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व संजू परब यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. गावातील रखडलेली विकास कामे आणि शिवसेना नेते देत असलेली केवळ आश्वासने यामुळेच या महिलांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे असे कार्यकर्ते सुनील राऊळ यांनी सांगितले आहे. यावेळी शिरशिंगे गावातील सर्व अडचणी दूर करून, विकास कामे मार्गी लावू फक्त आपण साथ द्या असे भावनिक आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे