*💫मालवण दि.१३-:* काव्यातील नक्षत्र या ई मासिकाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या दीप या विषयावरील काव्य लेखन स्पर्धेत आचरा गावचे मंदार सांबारी आचरा मालवण यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय सौ.सुजाता शिंदे ता.बारामती जि.पुणे व तृतीय क्रमांक सुभाष चव्हाण तालुका – हवेली जि.पुणे यांनी प्राप्त केला स्पर्धेत परीक्षण कविवर्य – सुनिल जाधव यांनी केले. स्पर्धेविषयी बोलताना ते म्हणाले की स्पर्धेच्या च्या नियमानुसार तीन स्पर्धकांची निवड करणे खरंच खूप अवघड काम होते , सर्व रचना सुंदर , अप्रतिम असताना त्यातून फक्त तीन नंबर काढताना परीक्षकाचा , परीक्षण करण्यास कस लागला, कवी , कवयित्री यांनी मनापासून अगदी अंतकराणातून काव्य लिहलेलं होत, त्यांच्या भावना , लेखणीतून अलगद कागदावर टिपले जाणारे शब्द , समोरच्याच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या, तसेच आनंद देणाऱ्या, आनंदायी कवितांही होत्या असे ते म्हणाले.
काव्य लेखन स्पर्धेत आचरा येथील मंदार सांबारी प्रथम
