*💫बांदा दि.१३-:* पाडलोस – केणीवाडा येथील बाबली साबाजी नाईक (४०) या युवकाने साळ (गोवा) येथे रविवारी आत्महत्या केली. बाबली हा गोव्यात एका दैनिकात वितरण प्रतिनिधी म्हणून कामाला होता. पत्नी व दोन मुलींसह तो साळ येथे भाड्याच्या खोलीत राहत असे. सध्या त्याची पत्नी मुलींसह माहेरी गेली होती. एकटा असल्याची संधी साधून बाबलीने गळफास घेत आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. बाबली हा शांत व मनमिळाऊ युवक म्हणून परिसरात परिचित होता. त्याचा मित्रवर्गही खूप मोठा होता. गावातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असायचा. बाबली साळ (गोवा) येथे भाड्याच्या खोलीत पत्नी व दोन मुलीसह राहत होता. त्याची पत्नी मुलींसह माहेरी गेली होती. पाडलोस येथे बाबलीने आत्महत्या केल्याची बातमी येताच परिसरात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे. पत्रकार उमेश नाईक यांचा तो भाऊ तर पत्रकार विश्वनाथ नाईक यांचा तो चुलतभाऊ होय. बाबलीवर सोमवारी सकाळी पाडलोस येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
पाडलोसच्या युवकाची गोव्यात आत्महत्या
