*राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डि. के. सुतार यांच्या सौजन्याने कार्यक्रम
*💫वैभववाडी दि.१३-:* माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद चंद्र पवार ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डि.के.सुतार यांच्या सौजन्याने माधवराव पवार विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला . आंबा, काजू, चिकू पोफळी, केळी आदी जातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर वळंजू, संचालक चंद्रकांत श्रीराम शिंगरे, राजाराम गडकर, ऍड प्रताप सुतार, ऍड प्रदीप रावराणे ,संदीप बेळेकर, रवींद्र सुतार ,श्रीराम पळसुले, शशिकांत गोखले आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित.