भाजपाच्या ओबीसी मोर्चा युवक जिल्हाध्यक्षपदी महेश गुरव…

जिल्हाध्यक्षांकडुन कार्यकारणी जाहीर ; युवकांचे मजबूत संघटन करण्याची दिली जबाबदारी..

*💫कणकवली दि.१३-:* भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने काही नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आले आहे त्यामध्ये ओबीसी मोर्चा युवक जिल्हाध्यक्ष पदी कणकवलीचे माजी उपसभापती महेश गुरव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे ओबीसी समाजाचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावताना युवकांचे मजबूत संघटन करण्याच्या दृष्टीने ही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहेत्यांची नियुक्ती ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर जाहीर केली आहे. त्याचबरोबर महिला जिल्हा अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा ओबीसी मोर्चा नूतन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष पदी विकास केरकर ( सावंतवाडी ) , लक्ष्मण नाईक ( दोडामार्ग ) , सुभाष नार्वेकर ( दोडामार्ग ) , सरचिटणीस पदी मनोहर खानोलकर ( वेंगुर्ले ) , प्रकाश माईनकर ( वैभववाडी ) , चिटणीस पदी उदय धुरी ( सावंतवाडी ) , सचिन तेली ( कुडाळ ) जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी प्रकाश पांचाळ ( वैभववाडी ) , शरद मेस्त्री ( वेंगुर्ला ) , प्रशांत तळवणेकर ( सावंतवाडी ) , समीर हळदकर ( कुडाळ ) आदींची संधी देण्यात आली आहे .ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी ही कार्यकारिणी रविवारी जाहीर केली आहे.

You cannot copy content of this page