यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण शिक्षक दिनी

प अध्यक्षा संजना सावंत

ओरोस-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हे पुरस्कार ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी वितरित करण्यात येणार असून जिल्हाभरातून प्राप्त प्रस्तावांची छाननी व संबंधित शिक्षकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद तर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२०-२१ करिता देवगड, कणकवली, वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यातून केवळ एक प्रस्ताव प्राप्त आहे. सावंतवाडी तालुक्यातून दोन प्रस्ताव आणि वैभववाडी तालुक्यातून दोन प्रस्ताव तसेच विशेष शिक्षक पुरस्कार यासाठी दोन प्रस्ताव प्राप्त होते. मालवण व कुडाळ तालुक्यातून एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. गतवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यवाहित दिरंगाई झाल्याने संबधित शिक्षकाना पुरस्कारापासुन वंचित रहावे लागले. याची दाखल घेत यावर्षी शिक्षकांना ५ नोव्हेंबर रोजी शिक्षक दिनी पुरस्काराचे वितरण व्हावे .यासाठी आज शुक्रवारी प्राप्त प्रस्तावांची छाननी व मुलाखत यासाठी प्रस्ताव प्राप्त शिक्षकांना बोलावले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी , प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी यांच्या उपस्तितीत प्रस्तावांची छाननी व मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आजच्या मुलखतीसाठी ८ शिक्षक उपस्तित होते. मुलखती व प्रस्ताव छाननी नंतर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची यादी आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली.

You cannot copy content of this page