कणकवली पोलिसांची फोंडाघाट येथील जुगार अड्ड्यावर धाड

२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; चार जणांना घेतले ताब्यात

*⚡कणकवली दि.०५-:* कणकवली पोलिसांनी अवैध धंद्याना चाप लावण्याचा निर्धार केला असून फोंडाघाट येथील मच्छी मार्केटच्या मागे सुरु असलेल्या अंदर बाहर जुगारावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली. सायंकाळी ४ वाजता टाकलेल्या धाडीत रोख ४१ हजार ५५५ रुपये व ३ मोटरसायकल दीड लाख,सतरंजी,पत्ते असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्यामसुंदर शिवाजी मोदी,(फोंडाघाट, कोरगावकरवाडी),हसन दलाल शेख (फोंडाघाट मारुती वाडी), संजय आकाराम सावंत (फोंडाघाट ),प्रज्वल दत्तात्रय मोदी(फोंडाघाट,कोरगावकरवाडी)आदींचा समावेश आहे. फोंडाघाट बाजारपेठेमध्ये मच्छी मार्केट मागील अंदर बाहर जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत गुरुवारी सायंकाळी ४ वाजता अचानक पणे धाड टाकून अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या पकडले.त्यात ४ जण ताब्यात घेण्यात आले आहेत.तर तिघेजण पशार झाले आहेत. रोख ४१ हजार ५५५ रुपये, ३ मोटर सायकल असे मिळून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात,अनमोल रावराणे, पोलीस हवालदार उत्तम वंजारे,पोलीस नाईक रुपेश गुरव, कैलास इन्कपाळ,सचिन माने वैभव कोळी आदींनी केली. अधिक तपास कणकवली पोलीस तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page