सिंधुदुर्ग पोलिसांकडून गेल्या सात महिन्यात तब्बल ७० लाख रुपयांचा दंड वसूल

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

*⚡सावंतवाडी दि.०५-:* जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या सात महिन्यात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांकडून सावंतवाडी, कणकवली विभाग आणि वाहतूक शाखेच्यावतीने विविध गुन्ह्यांसंदर्भात केलेल्या कारवाईत तब्बल ७० लाख ६४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात लायसन्स न काढणे, लायसन्स सोबत नसणे, हेल्मेट नसणे, काळी काच लावणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, गाडी चालविताना मोबाईल संभाषण, इन्शुरन्स नसणे, नो पार्किंग मध्ये गाडी लावणे, इशारा तोडणे तसेच इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. यात एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सावंतवाडी या दोन विभागासह वाहतूक शाखेचा एकूण ७० लाख ६४ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page