पर्यटन सिंधुदुर्गात वाहतूक पोलिसांची मनमानी सुरू

जय संघर्ष वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मसुरकर यांचा आरोप

*⚡कणकवली दि.०५-:* कोरोना काळात सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊनमुळे हैराण झालेले असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना अडवून कागदपत्रांच्या नावाखाली त्रास दिला जातो. दंड वसूल केला जातो. वाहन चालकांना जागोजागी थांबवून त्यांच्याकडून दंड वसुली करणे अशी वाहतूक पोलिसांची मनमानी सुरू असल्याचा आरोप जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मसुरकर यांनी केला आहे. वाहतूक पोलिसांच्या मनमानी विरोधात आता जय संघर्ष वाहन चालक संघटना वाहनचालकांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार आहे. देशभरात किंवा परदेशातही इतर ठिकाणी जेवढी वाहनांची तपासणी केली जात नाही तेवढी तपासणी पर्यटन जिल्हा असलेल्या सिधुदुर्गात केली जाते. यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील वाहतूक पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच अनेक ठिकाणी तपासणी करून या वाहन चालकांना मनस्ताप देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप जय संघर्ष वाहन चालक संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद मसुरकर यांनी केला आहे. या वाहनचालकांच्या बाजूने आता संघटना उभी राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून त्रास दिला जाईल त्यांनी माझ्याशी 94223 73223 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन श्री. मसुरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page