ज्ञानदा विकास संस्थेने वीज मंडळाचे लक्ष वेधले
*⚡वेंगुर्ला ता.०५-:* दाभोली गावात गेले काही दिवस सुरु वीजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थ जेरीस आले असून याबाबत येथील ज्ञानदा विकास संस्थेतर्फे वीज मंडळाचे लक्ष वेधताना गावातील वीज पुरवठा अखंडीत सुरु रहाण्यासाठी निवेदन दिले आहे. यावेळी ज्ञानदा संस्थेचे अध्यक्ष संदिप पाटील, उपाध्यक्ष गणपत राऊळ, सदस्य नारायण राजापूरकर, मंदार राऊळ, राजाराम कांबळी आदी उपस्थित होते. वीज मंडळाला देण्यात आलेले निवेदन कृष्णा साटेलकर यांनी स्वीकारले.
