३०२५ रुपये व जुगार साहित्य जप्त
*⚡दोडामार्ग ता.०५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत,त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. साटेली भेडशी येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून दोघाना अटक केली आहे.या कारवाईत ३०२५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या जुगारप्रकरणी दोघाना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. साटेली भेडशीत फक्त जुगारच नाही तर गोवा बनावट दारू विक्रीचेही भरपूर अड्डे आहेत. दोडामार्ग पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली तशी दारू अड्ड्यावरही टाकावी आणि अड्डे नष्ट करावे अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
