Headlines

पत्रादेवी लाठी पुन्हा बंद

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश : केवळ दुचाकी चालकांनाच प्रवेश

*⚡बांदा दि.०४-:* काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली पत्रादेवी येथील पोलीस लाठी आज सायंकाळी उशिरा पुन्हा बंद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याठिकाणी पाहणी करत लाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. याठिकाणी केवळ दुचाकी चालकांनाच प्रवेश देण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या. यावेळी दाभाडे यांनी गाळेल येथील पोलीस लाठीला देखील भेट दिली. पत्रादेवी येथील पोलीस लाठी तात्काळ हटवण्यात यावी यासाठी शिवसेना व भाजप यांच्यात श्रेयवाद रंगला होता. दोन्ही पक्षांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे लाठी हटवल्याचा दावा केला होता. त्यामुळे आज सायंकाळी उशिरा अचानक लाठी पुन्हा बंद करण्यात आल्याने स्थानकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

You cannot copy content of this page