नाटळ येथील मल्हारी पुल मार्चपर्यंत बांधणार

नाम.अशोक चव्हाण यांचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी वेधले लक्ष

*⚡कणकवली दि.०४-:* अतिवृष्टीत कोसळलेल्या कणकवली तालुक्यातील नाटळ येथील मल्हारी पुलाचे नवीन बांधकाम करण्यात यावे व या पुलावर अवलंबून असलेल्या 8 ते 10 गावांचा दळणवळणा प्रश्न सोडवावा अशी मागणी करतानाच हा पूल लवकारात लवकर बांधावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री नाम.अशोकराव चव्हाण यांची मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट केली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम.अशोकराव चव्हाण यांची मंत्रालयात त्यांच्या दालनात महिंद्र सावंत (सरचिटणीस सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी) यांनी भेट घेत नाटळ येथील मल्हारी पुल नवीन बांधण्यासाठी निवेदन देऊन लवकरात लवकर बांधून पूर्ण करावा अशी विनंती केली.यावेळी ना.चव्हाण यांनी हा पुल बांधणीसाठी तात्काळ कार्यवाही करून निविदा प्रक्रिया करून मार्चपर्यंत बांधू असे आश्वासन दिले.तसेच यावेळी महिंद्र सावंत यांनी पुरहानीमुळे जिल्ह्यातील बरेच रस्ते वाहून गेले आहेत,याकडे लक्ष वेधून तेही नवीन बांधण्यासाठी निवेदन दिले,लवकरच म्हणजे गुरुवारी चिपळूण मध्ये पुराहानी ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार आहे असे यावेळी नाम.अशोक चव्हाण यांनी सांगितले.

You cannot copy content of this page