सावंतवाडी शहरातील गटारे तुंबल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले

नगरपालिकेने गटारे साफ करावीत; राष्ट्रवादीची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

*⚡सावंतवाडी ता.०४-:* अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण झाली असून योग्य ती उपयोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी गटारे तसेच वाढलेल्या झाडांमुळे डासांचे प्रमाण वाढले असून सध्याच्या परिस्थितीत आरोग्याबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता असून शहरातील गटारे तसेच वाढलेली गटारावरील व शेजारील झाडे साफ करावी तसेच शहरात फिरणाऱ्या भटक्या कुत्री व जनावरे यांचे प्रमाण वाढले असून नगरपालिकेने लवकरात लवकर यावर योग्य ती कारवाई करावी असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष चित्रा देसाई, हिदायतुल्ला खान, शफीक खान, ऑगस्टीन डिसोजा, जावेद शेख, रवी पालेकर संतोष जोईल, इफतिका राजगुरू,आसिफ ख्वाजा, याकूब शेख आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page