तब्बल 350 किटस गरजवंतांपर्यंत पोहचवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन
*⚡कणकवली ता.०४-:* महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. बऱ्याच गावांमध्ये आणि शहरांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली कित्येकांना जीव गमवावा लागला तर बऱ्याच ठिकाणी अजून पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही. नुसती घरचं नाही तर उपजीविका ज्यावर चालते ती दुकानं, फॅक्टरीस, हॉटेल्समधील सामान वाहून गेले आहे.या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्याकडून मदत झाली पाहिजे असा विचार करून बायकर्स ब्रदरहूड क्लब पुढे सरसावला असून जवळपास 350 किटसचे वाटप चिपळूण परिसरात करण्यात आले आहे. बायकर्स ब्रदरहूड क्लबने मदत कार्याला सुरुवात केली असून यापूर्वी जेव्हा कोल्हापूरला पूर आला होता तेव्हाही असे मदतकार्य केले होते. चिपळूण पुराच्या पार्श्वभूमीवर प्रश्न होता ते सामान कुठे न्यायचं, काय सामान न्यायचं आणि कसाल न्यायचं. तर सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या चिपळूणला जायचा ठरले. अन्यधान्य आणि कपडे है शेकड्याने बरेच लोक घेऊन जात होते. मुळात अश्या जागा शोधण्याची गरज होती जिकडे मदत अजून पोचली नाही आहे त्यामुळे चिपळूण येथील स्थानिक संस्था आणि लोकल स्वयंसेवक शोधून काढण्यात आले.त्यांच्या मुळे कुठे कुठे जायचा हे कळले.चिपळूणच्या स्थानिक लोकांकडून विचारपूस करून एक यादी बनवण्यात आली. एकूण ज्या गोष्टी पाठवता येतील अशा ३० गोष्टींची यादी बनवण्यात आली.आणि जितके जास्त सामान नेता येईल ते न्यायचे ठरले. पहिल्या एक दोन दिवसात ग्रुप मधल्या लोकांचे फारच कमी पैसे जमले मात्र लॉकडाऊन काळ असला तरी ग्रुपचे पूर्वीचे काम पाहून बघून बऱ्याच लोकांकडून पैसे आणि सामान मिळू लागले. ३०० किट्स करायचे असं ठरले असताना मदतीचा ओघ इतका आला कि ५० किट्स अजून बनवले गेले. शनिवार आणि रविवारी १० लोकांना घेऊन दिड दिवस फक्त सामान किट्समध्ये भरण्यात आले. सामान घेऊन चिपळूणकडे जात असताना नुकसानाचा अंदाज आला.घाटात दरड कोसळून बराचसा रस्ता दगडांनी भरून गेला होता. नदीने आपला सगळा गाळ पसरवून ठेवला होतं घरांमध्ये चिखल होता.लोक जी मदत पाठवत होते ती शहरामध्ये तर जात होती पण त्यातच आतली गावं दुर्लक्षित होत होती म्हणून अश्या गावांमध्ये पहिले जायचे बायकर्स ब्रदरहूड क्लबने ठरवले.घराघरात जाऊन बायकर्स ब्रदरहूड क्लबने किट्स दिले. गावातील लोकानी मदत केली. नुसती घरचं नाही तर लोकांची उपजीविकेची साधना सुद्धा नष्ट झाली होती. २ दिवस धावपळ करून २ रात्र अर्धीच झोप घेऊन शेवटी बायकर्स ब्रदरहूड क्लबने ३५० किट्स पोहचवली. शहरा जवळच्या भागांमध्ये खूप मदत पोचली आहे पण अजून सुद्धा बऱ्याच गावांमध्ये मदतीची गरज आहे.आणि फक्त चिपळूणमधेच नाही तर महाड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड भागात सुद्धा खूप वाईट परिस्थितीमध्ये सध्या घरं आहेत पण नेमक्या ज्या घरात पाणी भरले त्याच घराना मदतीची जास्त गरज आहे असल्याचे बायकर्स ब्रदरहूड क्लब सदस्यांनी सांगितले.
