अतिवृष्टी नुकसानग्रस्ताना जास्तीत जास्त मदत द्या

नदयाचा गाळ काढा:महेंद्र सांगेलकर यांची महसूलमंत्री थोरात यांच्याकडे मागणी

*⚡सावंतवाडी ता.०४-:* अतिवृष्टीमळे सावंतवाडी तालुक्यात झालेल्या नुकसानी संदर्भात काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मुंबई येथे महसूल मंत्री बाळा थोरात यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळी नद्यांमधील गाळ काढण्या संदर्भात सांगेलकर यांनी थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन सांगेलकर यांना दिले आहे. यावेळी बबन डिसोझा ,मिनिन गम्स आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page