विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी मिळणार
*⚡बांदा दि.०३-:* बहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येतील विमानतळाचा उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी दिली आहे. श्री नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आज भेट घेत सविस्तर चर्चा केली त्यामुळे विमानतळाला केंद्र सरकारची परवानगी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या महिन्याभरात चिपी येथे विमानतळाचा उद्घाटनाचा समारंभ होणार आहे
