सिटू संलग्न सिंधुदुर्ग आशा वर्कर्स युनियनने विविध मागण्यांबाबत तहसीलदारांचे वेधले लक्ष

*⚡देवगड दि.०३-:* सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन शाखा देवगडच्यावतीने आपल्या न्याय मागण्याचे निवेदन देवगड तहसीलदार यांना दिले आहे . या निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख मागण्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा त्याकरिता भरघोस निधीची तरतूद व्हावी .आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी आरोग्य कर्मचारी म्हणून कायम करा, आशांना १८०००/- रुपये व गटप्रवर्तक गाना २१०००/-रुपये किमान वेतन सुरु करा. आशा व गटप्रवर्तकना गाच्युइटी,पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा सुरू करा. गेल्या वर्षी पासून लागू केलेली आशा ना दोन हजार रुपये ,व गटप्रवर्तकाना तीन हजार रुपये मानधन वाढ नियमित द्या .जून 2021 मध्ये जाहीर केलेल्या आशांना पंधराशे रुपये व गटप्रवर्तक आना सतराशेरुपये मानधन वाढ निर्णय त्याचा शासकीय आदेश त्वरित काढून जुलै २०२१ पासून देण्यात यावा .शेतकरीविरोधी तीन कायद्यात त्वरित रद्द करण्यात यावेत. कामगार विरोधी चार संविधान त्वरित रद्द करण्यात याव्यात विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण 2020 रद्द करण्यात यावे ,डिझेल पेट्रोल स्वयंपाकाचा गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई त्वरित कमी करावी. या मागण्यां चा प्रामुख्याने उल्लेख असून केंद्र व राज्य सरकारने वरील मागण्यांबाबत पूर्तता न केल्यास भविष्यात मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा या आशा वर्कर युनियनच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी अशा स्वयंसेविका विद्या सावंत, नीलिमा सारंग, विशाखा बांदिवडेकर, दिशा जगताप, प्रज्ञा धोपटे, योगिता राऊत,सा नवी कोयघाडी,समिक्षा लाड, कामिनी नाटेकर, उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page