*⚡मालवण दि.०३-:* मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. या महाविद्यालयातून ५१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. कला शाखेत २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यात प्रथम श्रेणी पाच आणि द्वितीय श्रेणीत २३ उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले प्रथम श्रेणीत ९ आणि द्वितीय श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात कला शाखेमध्ये प्रथम – रत्नप्रभा प्रमोद आढाव (४१७ गुण) ,द्वितीय- वैष्णवी सतीश पेडणेकर (४०१ गुण) तृतीय – सुभाष विश्वनाथ पालव (३९० गुण) यांनी यश मिळविले. तर वाणिज्य शाखेमध्ये प्रथम – शकुंतला लक्ष्मण केळुसकर (५११ गुण ), द्वितीय – ऋषिकेश वसंत सामंत (४७० गुण) व तृतीय – साक्षी रामचंद्र गोलतकर (४१३ गुण) यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव श्री. चंद्रशेखर कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण व समिती सदस्य, कॉलेजच्या प्राचार्या डॉ .उज्वला सामंत, प्राध्यापक सौ. स्नेहा बर्वे, प्रा. मिलन सामंत, प्रा. सौ. अन्वेशा कदम, प्रा. सौ. हर्षदा धामापुरकर व प्रा. हसन खान तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मालवणच्या रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेची शकुंतला केळुसकर प्रथम
