आर पी बागवे ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के

*⚡मालवण दि.०३-:* मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम.जी. बागवे (भरतगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे या प्रशालेतून १८ नियमित व ३ पुनर्परीक्षार्थी प्रविष्ठ होऊन सर्व विद्यार्थि उत्तीर्ण झाले. निकाल १००%. लागला. या ज्युनिअर कॉलेजमधून १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यातील एका विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळविले असून प्रथम श्रेणीत १३ आणि द्वितीय श्रेणीत चार उत्तीर्ण झाले आहेत. या मध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक- कौण्डिन्य मिलिंद पवार, ४५७ गुण ७५.००%, द्वितीय क्रमांक-प्रणय प्रकाश चिरमुले, ४३३ गुण ७२.१७%, तृतीय क्रमांक- प्रथमेश भगवान सावंत, ४३० गुण ७१.६७% असे आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थी यांचे अभिनदन मुंबई कमिटी अध्यक्ष डॉ दीपक परब, सेक्रेटरी जे डी बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, मुख्याध्यापक आर डी कीलेदार, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, विठ्ठल लाकम, सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page