सामाजिक कार्यकर्ते राकेश धुरी व मित्रमंडळाचा पुढाकार
*⚡वेंगुर्ले ता.०३:* आसोली गावातील हायस्कूल समोरील पुलाखाली अडकलेल्या गाळाची आज श्रमदानातून साफसफाई करण्यात आली.येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश धुरी व त्यांच्या मित्र मंडळाने यासाठी पुढाकार घेतला.दरम्यान त्यांनी केलेल्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी नारायण घाडी,संतोष चव्हाण,तुषार परब,प्रवीण किनळेकर,राजाराम किनळेकर आदी युवक या श्रमदानात सहभागी झाले होते. गावाच्या मध्यभागी असलेल्या या पुलाची उंची कमी असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचतो.दरम्यान मुसळधार पावसात पाणी पुलावरून वाहू लागते.त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचा संपर्क तूटतो.तर शाळेच्या दिवसात पुलावर पाणी आल्यानंतर प्राथमिक शाळेत व हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी गैरसोय होत असते.त्यामुळे भविष्यात या ठिकाणी उपाय योजना करण्यात याव्यात,अशी मागणी यावेळी या युवकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
