मालवणात ३०५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

*⚡मालवण ता.०३-:* मालवणात जुलै महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ३०५ वाहनचालकांवर ६८ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. मालवण शहरात ट्रिपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही कारवाई केली.

You cannot copy content of this page