कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ऑनलाईन स्पर्धांना वेग

*⚡सावंतवाडी ता ०३ सहदेव राऊळ-:* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध ऑनलाईन स्पर्धांना वेग आला आहे.गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना महामारीची पहिली लाट पसरताच कडक लॉकडाऊन व संचारबंदीमुळे नोकरी, उद्योगधंदे शाळा बंद पडल्या. त्याचबरोबर कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा आदी स्पर्धांसह भजन स्पर्धाही बंद पडल्या. त्यामुळे या सर्व स्पर्धा विविध मंडळांतर्फे ऑनलाईन घेण्यात येत होत्या. ऑक्टोबर नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताच प्रत्यक्ष दशावतारी नाटके व भजन स्पर्धांनी वेग पकडला होता. मात्र पुन्हा एकदा फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने दशावतारी नाटकांसह भजन स्पर्धा पुन्हा बंद पडल्या. त्यामुळे ऑनलाईन अभंग गायन तसेच भजन स्पर्धांनी पुन्हा वेग पकडला आहे. विविध मंडळांतर्फे कोकणस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येत आहेत.

You cannot copy content of this page