आरोस दांडेली येथे बीएसएनएलचे नेटवर्क गायब

मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मनसेने घेराव घालत विचारला जाब

*⚡सावंतवाडी ता.०३-:* बीएसएनएल नेटवर्कचा फज्जा गेले काही दिवस तालुक्यात उडाला असून, आरोस दांडेली येथे नेटवर्क मिळत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसेने घेराव घालत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. तसेच त्या भागतील एक एक कामगार ६ – ७ डिव्हिजन सांभाळत आहेत. त्या कामगारांचे पगार देखील गेले ७-८ महिने कॉन्ट्रॅक्टरने दिले नाही आहेत. यावेळी येत्या आठ दिवसांत ही समस्या दूर करण्यात यावीत अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा डिव्हिजनल इंजिनीयर कुलकर्णी यांना दिला आहे. यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, अभिजित आरोसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page