तब्बल 10 लाख 82 हजारांच्या अवैध दारुसह 17 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त
*⚡कणकवली ता.०२-:* राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची 10 लाख 82 हजार रुपये किमतीची दारू आणि टेम्पो, मोबाईल असा 17 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कणकवली शहरातील हॉटेल अनंत समोर एक्साईज अधीक्षक डॉ. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली निरीक्षक गणेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. संशयास्पद आयशर टेम्पो क्र. MH -04 -EY- 8964 हा हॉटेल अनंत समोर थांबवून टेम्पोच्या हौद्यात तपासणी केली असता चोरकप्प्यात गोवा बनावटीची दारू सापडली.या प्रकरणी सौरभ सतीश ढोकळे ( रा.झरेगाव, चिलवाडी , ता.जि.उस्मानाबाद ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ लक्ष्मण राणे, जवान एस एस चौधरी, वाहनचालक मुपडे, वाहनचालक चव्हाण, महिला जवान स्नेहल कुवेसकर हे सहभागी होते.साजिद शहा, खान यांनी याकामी मदतनीस म्हणून काम केले. अधिक तपास निरीक्षक गणेश जाधव करत आहेत.
