भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बांदा-इन्सुली, शेर्लेतील पुरग्रस्ताना दिला आधार

*⚡बांदा दि.०२-:* महापुरामुळे नुकसान झालेल्या बांदा- इन्सुली शेर्ले परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक कुटुंबांना ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जावीद खतीब यांच्या पुढाकारातून विविध ट्रस्टच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू आणि चारशे पिण्याच्या पाण्याचे बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील आठवडय़ात बांदा परिसरात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचा फटका बसल्याने सर्वसामान्य कुटुंबांसमोर उपासमारीची वेळ आली होती या पाश्र्वभूमीवर अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत बाधित कुटुंबांना मदतीचा हात दिला होता यात जावेद खतीब यांनी स्वत पुढाकार घेत विविध ट्रस्टच्या माध्यमातून जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.

You cannot copy content of this page