नगराध्यक्ष संजू परब यांचा १५ ऑगस्टला उपोषणास बसण्याचा इशारा
*⚡सावंतवाडी ता.०२-:* चांदा ते बांदा योजनेतून सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील तसेच आंबोली येथील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संबंधित यंत्रणेकडे वारंवार चौकशीची मागणी करून देखील अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १५ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी पत्रक दिले असून त्यात असे म्हटले की युती सरकारच्या काळात दीपक केसरकर पालकमंत्री असताना चांदा ते बांदा ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती मात्र या योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप श्री संजू परब यांनी केला आहे.
