लाखो रुपये किंमतीचा माल रस्त्यावर विखुरला
*⚡दोडामार्ग दि.०२-: सुमित दळवी* दोडामार्ग गोवा सीमेवर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका सुसाट डंपरची गोवा येथे एका मॉलचे सामान घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली त्यामुळे टेम्पोचा एका बाजूने भाग कापला जाऊन आत भरलेला लाखो रुपये किंमतीचा माल सौंदर्य प्रसाधने, गुडनाईट मच्छर व इतर सामान रस्त्यावर पडले. अंधार पडायला हा अपघात झाला त्यामुळे अनेकांनी काही माल लंपास केला यात डंपर मधिल एक जण जखमी झाला त्याला दोडामार्ग रुगणालय दाखल केले. अपघाताचे वृत समजताच गोवा दोडामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुंबई येथे एका.(कॉसमॅटिक) मॉलचा लाखो रुपये किंमतीचा माल भरून GA 04 T 5289 हा आयशर टेम्पो दोडामार्ग येथून गोवा येथे जात असताना गोवा येथून दोडामार्ग पेट्रोल पंप येथे येणारा सुसाट डंपर KA 22 B 6959 याची जोरदार धडक बसली त्यामुळे डंपर चालक जखमी झाला त्याला दोडामार्ग रूगणालय दाखल केले. अपघात होताच आयशर टेम्पो मधिल लाखो रुपये किंमतीचा कोसमाटी सामान रस्त्यावर पडले
