माडखोल धवडकी परिसरात आलेला पूर नदीपात्रात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळेच

श्री देव विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांचा आरोप;अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कंपनीकडूनच नुकसान भरपाई वसूल करण्याची पालकमंत्र्यांकडे केली मागणी

*⚡सावंतवाडी ता.०२:* माडखोल धवडकी परिसरात अतिवृष्टीमुळे आलेला पूर हा नदीपात्रात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळेच माडखोल धवडकी परिसरात महापौर येऊन ग्रामस्थांचे शेती बागायती व घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सदर नुकसानभरपाई ही संबंधित कंपनीकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी श्री देव विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी शेतकरी संघटनेमार्फत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे म्हटले की मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बांदा, शेर्ले, विलवडे, वाफोली ,परिसराला मोठ्या प्रमाणात बसला होता मात्र माडखोल धवडकी परिसरात हिरानंदानी या कंपनीने काही वर्षांपूर्वी जमीन घेतली होती सदर कंपनीने नदीपात्रात अनधिकृतपणे. मोठ्या मोठ्या भिंती उभारून या भिंती लोकांच्या नजरेस येऊ नये म्हणून त्यावर भराव घालून मुख्य रस्त्यापासून उंची वाढवण्यात आली होती या अनधिकृत बांधकामाचा फटका माडखोल धवडकी परिसराला बसल्यानेच येथील ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने संबंधित कंपनीकडून ही नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page